उस्मानाबादचे दक्ष आमदार कैलास पाटील कोरोनामुक्त


उस्मानाबाद / प्रतिनिधी ः उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील हे मागच्या काही दिवसांपासून प्रशासकिय आणि जनसेवेसाठी कार्यरत असताना कोरोनाने संक्रमित झाले होते. परंतू मागच्या 10-12 दिवसांनंतर योग्य उपचारानंतर आत्ता ते कोरोनामुक्त झालेले आहेत. परंतू यापुढील काळात कोणालाही कोरोना संक्रमण होऊ नये म्हणून नागरिकांनी जबाबदारीने नियमांचे पालन करावी अशी अपेक्षा आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून संपूर्ण जगात कोरोना महामारीने थैमान घातलेले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातच नाही तर अगदी गल्लोगल्लीत प्रत्येक कुटूंबाकडून, प्रत्येक व्यक्तीला कोरोनाच्या धास्तीने घराबाहेर पडण्यासाठी मज्जाव केलेला आहे. परंतू अशात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. त्याशिवाय इतर शासकीय, निमशासकीय कामांसाठी, शाळा महाविद्यालयाच्या कामांसाठी वा इतर नितांत गरजेच्या कामासाठी बाहेर पडावं लागत आहे. अशाच या सर्व सामान्य नागरिकांच्या गरजा व अत्यावश्यक सेवा त्यांना पुरवण्यासाठी जबाबदार तथा जनमताने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडणे गरजेच आहे. हिच गरज ओळखून उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांनी कशाचीच तमा न बाळगताना जनसेवेचं प्रण पूर्ण करताना त्यांना कोरोनाची लागण झालेली होती. दरम्यान पाटील यांना कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याने त्यांची रॅपिड टेस्ट करण्यात आली होती. त्यावेळी ते कोरोना पॉझिटेव्ह आले होते.
कोरोना पॉझिटव्ह झाल्यानंतर आमदार श्री पाटील यांनी तात्काळ कॉरंटाईन झाले होते. तब्बल 10 ते 15 दिवसांनंतर काल त्यांनी कोरोनाशी चार हात करुन कोरोनावर विजय मिळवला आहे. त्यांनी कोरोनावर मात केल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी त्यांना फोनवरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
आमदार कैलास पाटील यांनी आपल्या सर्व चाहत्यांचे धन्यवाद व्यक्त करुन सर्वांनी आपली स्वतःची ही काळजी घ्यावी आणि शासकीय यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा ही यावेळी त्यांनी व्यक्त केली. त्यांनी यापुढील काळात निरोगी आणि सदृढ आयुष्य लाभो अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांकडून विधात्याकडे अपेक्षा केली जात आहे.