अहमदपूर डॉ. एस. जी. तोंडारे यांची बौद्धिक आणि शारिरीक श्रमातुन ध्येयपूर्ती आत्मकथा या आत्मकथेचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कुलगुरु डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथुन जवळच असलेल्या नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात नुकता प्रा. डॉ. सिद्धराम गुंडप्पा तोंडारे यांच्या बौद्धिक आणि शारिरीक श्रमातुन ध्येयपूर्ती आत्मकथा या आत्मकथेचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी कुलगुरु डॉ. उद्धव भोसले, डॉ. लक्ष्मण पाटील, प्रा. महेश नेलवाडे, प्रा. मुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डॉ. तोेंडारे यांच्या आत्मकथेचे डॉ. उद्धव भोसले यांच्या शुभस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना कुलगुरु डॉ. उद्धव भोसले म्हणाले की, डॉ. तोंडारे यांनी लिहिलेली आत्मकथा ही तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. प्रत्येक मनुष्य आपल्या ध्येयपुर्तीसाठी जीवनभर प्रयत्न करत असतो. जीवनभर तो जे कार्य करतो तेच प्रत्येक मानवाच्या जीवनाची आत्मकथा असते मात्र प्रत्येकजण आपल्या जिवनातील घडलेल्या घटना ग्रंथरुपाने लिहुन ठेवित नाही. अश्या प्रकारे साहित्य निर्माण होणे गरजे आहे. अश्या साहित्याच्या आधारानेच पुढची पिढी आदर्श घेवून आपल्या जीवनाचे मार्गक्रमण करत असते. यासाठी डॉ. तोंडारे यांनी लिहिलेल्या बौद्धिक आणि शारिरीक श्रमातुन ध्येयपूर्ती आत्मकथा या आत्मकथेचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असेही ते शेवटी म्हणाले.